‘सहकार शिरोमणी’ची पहिली उचल २७०० रुपये : चेअरमन कल्याणराव काळे

सोलापूर : भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चालू २०२३-२४ हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रती टन २७०० रुपये देणार असल्याची घोषणा चेअरमन कल्याणराव काळे यांनी केली. याचबरोबर गेल्या हंगामातील ऊस पुरवठादार शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार यांच्या सर्व प्रलंबित बिलांसह कामगारांचे ऑक्टोंबर २०२३ पर्यंतचे पगारही एकरकमी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याचेही काळे सांगितले.

गत गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाला प्रती टन २५११ रुपये दर जाहिर करण्यात आला होता. मात्र, कमी गळीत आणि आर्थिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांची ऊस बिले देता आली नाहीत. अशा शेतकऱ्यांना ५० रुपये जादा दरासह प्रती टन २५६१ रुपये प्रमाणे आणि ज्या ऊस पुरवठादारांना प्रतीटन २३०० रुपये प्रमाणे बिले देण्यात आलेली होती, त्यांना उर्वरीत २११ रुपये प्रमाणे संपूर्ण ऊस बिले गुरुवारी (दि. ९) संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहेत. गेल्या हंगामात एफआरपी पेक्षा प्रतीटन ४०७ रुपये जादा दर दिल्याचेही काळे यांनी सांगितले. काळे म्हणाले कि, बिगर अॅडव्हान्स ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांना ५० टक्के ऊस वाहतुकीवर आणि २० टक्के ऊस तोडणीवर कमिशनसह बिले रोखीने पाच दिवसात देण्यात येणार आहेत. ऊस उत्पादकांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्यास गळीतास द्यावा आणि सांघिक प्रयत्नातून हा हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन काळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here