केदारेश्वर साखर कारखान्याचे ४ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : उपाध्यक्ष माधवराव काटे

अहमदनगर : संघर्ष योद्धा स्व. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्यावर्षी चार लाख टनापेक्षा जास्त गाळप केले होते. यंदाही कारखान्याचे चार लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन संघर्षयोद्धा स्व. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा स्व. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या पहिल्या अकरा साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक ॲड. प्रतापराव ढाकणे तसेच कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली साधूसंत व महंतांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात काटे बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, चीफ केमिस्ट पुंडलिक सांगळे, चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड, चीफ इंजिनियर प्रवीण काळूसे, लीगल ऑफिसर शरद सोनवणे, संचालक बाळासाहेब फुंदे, भाऊसाहेब मुंडे, शिवाजी जाधव, त्रिंबक चिमटे, सदाशिव दराडे, संदीप बोडखे, पांडुरंग काकडे, बापूराव घोडके, केनियार्ड सुपरवाईजर किसन पोपळे, तुकाराम वारे, ऊस विकास अधिकारी सचिन राऊत, अंबादास दहिफळे, सुधाकर खोले यांच्यासह शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here