सोलापूर : माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी आ.रामभाऊ सातपुते यांचे वडील विठ्ठल सातपुते यांच्यासमवेत पालावरच्या नागरिकांसमवेत दिवाळी साजरी करत सामाजिक बांधिलकी जपली. मांडवे येथील ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन ऊसतोड कामगार, भेट महिला व त्यांच्या लहान लहान मुलांना दिवाळी फराळ, फटाके तसेच नवीन कपडे देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दिवाळी ही आनंदाची, चैतन्याची आणि तेजोमय दिव्यांची असते. मात्र आपल्या आजूबाजूला कामानिमित्त घरापासून दूर असलेले पालावर राहणारे बांधव दिवाळी करू शकत नाहीत. त्यांच्या घरी दिवाळी व्हावी, असे वाटते. त्याच जाणीवेतून मांड येथील ऊसतोड कामगारांच्या पालावर संस्कृती सातपुते यांनी जाऊन त्यांची घेतली, विचारपूस केली. त्यांना कपडे, मिठाई भेट दिलीआयुष्यात कुणाच्या तरी चेहऱ्यावर आपण हास्य आणू शकलो याचा मोठा आनंद असल्याचेही संस्कृती सातपुते यांनी सांगितले.