सोलापूर : येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याने लक्ष्मीपूजनानिमित्त पहिली उचल २६०० रुपये जाहीर केली आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यात कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पहिली उचल २६०० रुपये जाहीर केली. यंदा दहा लाख टन उस गाळप होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, व्हा चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालिका स्वरुपाराणी मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते- पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, व्हा. चेअरमन ॲड. मिलींद कुलकर्णी, एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजीत डुबल, जनरल मॅनेजर रवींद्र जगताप, संचालक, अधिकारी व कामगार उपस्थित होते. शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघात व्हा चेअरमन दत्तात्रय भिलारे, त्यांच्या सुविद्य पत्नी विमल भिलारे या उभयतांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक रवींद्र इनामदार, संचालक, अधिकारी व कामगार उपस्थित होते.