नवी दिल्ली : तांदूळ, गहू आणि आट्याच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, गहू आणि तांदूळ या दोन्हींचे साप्ताहिक ई लिलाव आयोजित केले जातात. 21 वी ई-लिलाव प्रक्रिया 15.11.2023 रोजी आयोजित करण्यात आला होती. ज्यामध्ये खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत (घरगुती) आणि 2.84 लाख मेट्रिक टन (LMT) गहू आणि 5830 (MT) तांदूळ 2334 बोलीदारांना विकले गेले.
गव्हाच्या राखीव विक्री किंमत प्रति क़्विटल 2150 रुपयेच्या तुलनेत 2246.86 प्रति क़्विटल तर URS गव्हाची प्रति क़्विटल 2125 रुपयांच्या तुलनेत 2232.35 रुपयांना विक्री झाली. वरील व्यतिरिक्त, OMSS (D) अंतर्गत 2.5 लाख मेट्रिक टन (LMT) गहू केंद्रीय भंडार/NCCF/NAFED सारख्या निम-शासकीय आणि सहकारी संस्थांना वाटप करण्यात आला आहे. व्यापार्यांना OMSS (D) अंतर्गत गहू विक्रीच्या कक्षेपासून दूर ठेवण्यात आले आहे आणि 14.11.23 पर्यंत साठेबाजी टाळण्यासाठी देशभरात 1917 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या आहेत.