कोल्हापूर : आजरा साखर कारखान्यातील संचालकांमधील मतभेदाने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. हा सहकारी कारखाना आगामी काळात पुन्हा खासगी घटकांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. या कारखान्यातील राजकारणामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. साखर कारखान्यातील कच्चा माल हा कारखान्याचा ‘वीक पॉईंट’ ठरला आहे.
स्व. वसंतराव देसाई व जयवंतराव शिंपी यांच्यातील राजकारणानंतर सहकार तत्त्वावरील कारखाना खाजगीकडे गेला. आता ११-१० मुळे कारखाना अधोगतीकडे जात आहे. दोन वर्षे बंद पडला. पुन्हा सुरू केला; मात्र तो जेमतेमच. कारखान्याची प्रगती होण्यापेक्षा कर्जामध्ये मात्र प्रगती दिसते. एकमेकांवर खापर फोडण्याचे काम उत्कृष्टरीत्या सुरू आहे.
या साखर कारखान्याच्या निवडणूक लागली तर सुमारे ८० लाखांचा बोजा पडणार आहे. राजकारणासाठी कारखान्याचा बळी द्यायला नको असा सवाल आहे. शेतकऱ्यांच्या विकासाचे केंद्र असणाऱ्या या संस्थेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. तालुक्यात धरणे झाल्याने ऊस क्षेत्र वाढत आहे; मात्र केवळ राजकारणामुळे बराचसा ऊस बाहेर जातो. आर्थिक गणित न जुळल्याने कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.