सांगली जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाचा भडका

सांगली : गतवर्षीच्या उसाला ४०० रुपयांचा हप्ता मिळावा व चालू वर्षाच्या गळीत उसासाठी ३५०० रुपये दर जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले. नांद्रे, वसगडे, शिरगाव, भिलवडी, पलूस या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. शेतकरी व कारखानदार यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे.

‘स्वाभिमानी’ने सांगली शहरासह जिल्हाभर चक्काजाम प्रमुख मार्गावर वाहतूक ठप्प झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी, ऊसदराची कोंडी जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत ऊसदर आंदोलनाच्या बाबतीत कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही. अशी ठाम भूमिका घेतल्याची प्रतिक्रिया दिली. ऊस तोडणी वाहतूकदारांनीही सहकार्य करावे. अन्यथा स्वस्थ बसणार नाही असा इशारा राजोबा यांनी दिला.

रविवारी सकाळपासूनच शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. वाहनधारकांनाही याचा त्रास सहन करावा लागला. लक्ष्मी फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार घोषणबाजी केली. समडोळी, कवठेपिरान,नांद्रे, वसगडेसह जिल्ह्यामध्ये ज्या-ज्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी गडबड करु नये, असे आवाहन करण्यात आले. दुधगाव, माळवाडी, सावळवाडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, तुंग परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली – आष्टा मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. दोन किलोमीटर पेक्षा अधिक रांगा लागलेल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here