पहिली उचल प्रति टन ३५०० रुपये द्यावी : माळेगाव कारखान्याला निवेदन

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना व कष्टकरी शेतकरी समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चालू हंगामातील उसाला पहिली उचल प्रति टन ३५०० रुपये द्यावी, अशी मागणी तालुका अध्यक्ष विलास सस्ते, उदयसिंह फडतरे, पोपट निगडे, सुखदेव जाधव यांनी केली. याबाबतचे निवेदन कार्यकारी संचालक अशोक पाटील यांना देण्यात आले.

सध्या ऊस शेती करताना अनंत अडचणी आहेत. शेतीची मशागत मजुरांचे वाढलेले दर, खतांच्या वाढलेल्या प्रचंड दरामुळे ऊस शेती करणे अवघड झाले आहे. साखरेचे वाढलेले दर व उपपदार्थ निर्मितीतून मिळणाऱ्या नफ्यातून ३५०० रुपये पहिली उचल कारखान्याने द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर सभासदांचा ऊस अधिक गाळप करावा, ऊस तोडणीचे योग्य धोरण ठरवावे, या मागणीचे निवेदन कष्टकरी शेतकरी समितीच्या वतीने अरविंद बनसोडे, दशरथ राऊत, विक्रम कोकरे, अमित जगताप, विजयकुमार देवकाते, अजय देवकाते यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here