राजमाता सईबाई महाराज स्मृती स्थळास २९.७३ कोटी मंजूर : खा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मानले उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार

सातारा : राजमाता सईबाई महाराज स्मृती स्थळास २९.७३ कोटी मंजुर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर म्हणाले, देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री यांचे राजगड येथील समाधी स्थळ दुर्लक्षित होते. त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार रणजितसिह नाईक- निंबाळकर यांनी राजमाता सईबाई महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार, सुशोभीकरण व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी निधीची मागणी केली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील तातडीने विशेष बाब म्हणून २९.७३ कोटी मंजूर केले. याप्रश्नी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन १७ नोव्हेंबर २०२३ रोजी २९.७३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. राजमाता सईबाई महाराज यांच्या समाधीच्या ऐतिहासिक जीर्णोद्धार, सुशोभीकरणाचे काम पाहण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी विकास आराखडा सचिवांना सादर करून लवकरात लवकर काम सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. खा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आता समाधीच्या जीर्णोद्धारास गती येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here