प्रतापगड साखर कारखाना २८५० रुपये दर देणार : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याकडून उसाला प्रती टन २८५० रुपये पहिली उचल देण्यात येणार आहे. अजिंक्यतारा – प्रतापगड साखर उद्योग समूहाचे मार्गदर्शक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याची घोषणा केली. तालुक्यातील एकमेव प्रतापगड सहकारी साखर कारखाना असलेला कारखाना गेल्या ५ वर्षांपासून बंद होता. कारखाना पुन्हा सुरू व्हावा आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पुढाकार घेतला आहे.

प्रतापगड कारखान्याचा हा पहिलाच गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी आणि प्रतापगड कारखाना अर्थाने उभा राहावा, यासाठी सर्वांचे सहकार्य आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे आणि संचालक मंडळाकडून नियोजनबद्ध धोरण राबवून कारखाना चालवला जात आहे. सध्याच्या नियोजनानुसार कारखाना गाळपास आलेल्या उसाला प्रती टन २८५० रुपये पहिली उचल देणार असल्याची माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली. हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here