‘स्वराज’कडून जिल्ह्यात उच्चांकी ३१०१ रुपये ऊस दर : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

सातारा : सातारा जिल्ह्यातील उपळवे (ता. फलटण) येथील लोकनेते हिंदुराव नाईक – निंबाळकर साखर कारखान्याने उच्चांकी ऊस दर दिला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर, पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज कारखाना यशस्वीपणे सुरू आहे.स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड संचलित या कारखान्याने यंदाच्या हंगामात गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रती टन ३१०१ रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे.

कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा हप्ता वर्ग करण्यात आला आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे दाम मिळाले पाहिजेत, ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. भविष्यातही स्वराज कारखाना शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here