पुणे : शेती माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे. प्रशासकीय सेवेतील प्रदीर्घ सेवेनंतर मी शेती आणि सामाजिक कामांसाठी स्वत:ला वाहून घेणार आहे. शेतीसाठी पूर्णवेळ देणे मला आवडेल असे आवाहन साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले यांनी केले. कॉम्पिटिटर्स फाउंडेशनतर्फे दिवंगत संसदरत्न खासदार राजीव सातव स्मृती पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. डॉ. भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुरुपती डॉ. पी. डी. पाटील, दिवंगत राजीव सातव यांच्या आई, माजी मंत्री रजनी सातव, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे प्रमुख विलास शिंदे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जायभाये, डॉ. मनोज मते, सचिव ॲड. विठ्ठल देवखिळे व सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे आदी उपस्थिती होती. आयएएस अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. संजयकुमार भोसले ३० नोव्हेंबर २०२३ रोजी निवृत्त होत आहेत. कार्यक्रमात डॉ. भोसले यांनी प्रशासकीय सेवेतील वाटचालीचा आढावा घेतला. कायर्क्रमात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आपण शेती जरूर करा, पण राजकारणातही येण्याचा विचार करा असे आवाहन केले. कार्यक्रमाला डॉ. भोसले यांच्या पत्नी सीए अपर्णा, चिरंजीव हवाई दलातील फ्लाईंग ऑफिसर आदित्य, पत्नी नीतिकासह उपस्थित होते. निवृत्त लष्करी अधिकारी मेहता आदी उपस्थित होते.