मुंबई: तेल विपणन कंपन्यांना (OMC) 561 कोटी रुपयांचे इथेनॉल पुरवण्यासाठी बीसीएल इंडस्ट्रीजची निवड करण्यात आली आहे. या बातमीमुळे सोमवारी बीसीएल इंडस्ट्रीजचे शेअर्स 11 टक्क्यांहून अधिक वाढून 60.25 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनी 8.20 लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा करणार आहे. बीसीएल इंडस्ट्रीज आणि त्याच्या उपकंपनी स्वच्छ डिस्टिलरीने ऑइल मार्केटिंग कंपनीज (OMC) च्या टेंडरमध्ये भाग घेतला होता. कंपनी नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत 8.20 लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा करेल.
बीसीएल इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या स्वच्छ डिस्टिलरीला 10,000 लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्याची ऑर्डरही मिळाली आहे.स्वच्छ डिस्टिलरी रिलायन्स इंडस्ट्रीजला हे इथेनॉल पुरवणार असून या ऑर्डरची किंमत 6.73 कोटी रुपये आहे. कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 3.12 रुपयांवर होते आणि 4 डिसेंबर 2023 रोजी शेअर्स 60.25 रुपयांवर पोहोचले आहेत.