पुणे : साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 2023-24 च्या हंगामात 06 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 183 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यामध्ये 91 सहकारी आणि 92 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश असून 214.39 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात आतापर्यंत 172.23 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सध्या राज्यात साखरेचा सरासरी उतारा 8.03 टक्के आहे. गेल्या हंगामात याचवेळी 192 साखर कारखाने कार्यरत होते आणि त्यांनी 286.97 लाख टन उसाचे गाळप करून 255.09 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते.
महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे सोलापूर विभागात आतापर्यंत 45 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, 06 डिसेंबर 2023 पर्यंत सोलापूर विभागात सध्या 49.81 लाख टन उसाचे गाळप करून 36.9 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. येथे उसाचा सरासरी उतारा 7.41 टक्के आहे. राज्यात सर्वात कमी अमरावती विभागात केवळ 2 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे.