केंद्र सरकारच्या इथेनॉल बंदी आदेशाची ‘स्वाभिमानी’कडून होळी

सांगली : केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा आदेश काढला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीतून मिळणारे जादा उत्पन्न मिळणार नाही. त्याचा परिणाम अंतिम ऊस दरावर होईल असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून या आदेशाची होळी केली. वसगडे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले.

यावेळी कार्याध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले की, केंद्र सरकारच्या या आदेशामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले साखर कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्प अडचणीत येणार आहेत. सरकारला फक्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे जादाचे मिळतात हे पाहवत नाही. सरकारला साखरेची निर्यात बंदी व उसापासून इथेनॉल निर्मिती बंदी घालण्याचा काय अधिकार आहे. रासायनिक खतांच्या किंमती कमी करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. यावेळी धन्यकुमार पाटील, जगन्नाथ अर्जुने, आनंदा हजारे, पुंडलिक संदलवाडे, मनोहर पाटील, प्रवीण पाटील, संदीप पाटील, मुकेश पाटील, पवन पाटील, अमित पाटील, विजय पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here