सातारा : जावली तालुक्यातील सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याकडून यंदा उसाला प्रती टन ३,००० रुपये दर दिला जाणार आहे, अशी घोषणा अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योग समूहाचे मार्गदर्शक, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखाना पुन्हा सक्षमपणे सुरू व्हावा यासाठी आपला ऊस प्रतापगड कारखान्याला घालून हंगाम यशस्वी करावा असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेली पाच वर्ष कारखाना बंद होता. तो अजिंक्यतारा – प्रतापगड साखर उद्योग समुहाच्या माध्यमातून पुन्हा सुरू केला आहे. अनंत अडचणींवर मात करून समूहाने हा कारखाना सुरू केला आहे. त्यामुळे स्थानिकांसह बाहेरूनही ऊस जादा प्रमाणात गाळपासाठी येत आहे. यंदाचा हंगाम अडचणीत आहे. परंतु, कारखाना पुन्हा उभा राहिला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतापगड कारखान्याला ऊस पाठवावा. गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रती टन ३,००० रुपये दर दिला जात आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi प्रतापगड कारखाना ३,००० रुपये ऊस दर देणार : छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले