नवी दिल्ली : फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अन्नधान्य महागाई रोखण्यासाठी अलीकडेच अनेक उपाययोजना केल्यानंतर, देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार गहू आणि हरभऱ्यावरील आयात शुल्कात कपात करण्यासह इतर अनेक प्रस्तावांवर चर्चा करत आहे.
सूत्रांनी फायनान्शियल एक्स्प्रेसला सांगितले की, सरकार गव्हाच्या किमतींवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि किंमती कमी करण्यासाठी सर्व संभाव्य उपायांचा विचार केला जात आहे. व्यापार्यांच्या मतानुसार, जागतिक किमती मंद झाल्यामुळे सरकारने खाजगी कंपन्यांना गव्हावरील आयात शुल्क कमी करून गहू खरेदी करण्याची परवानगी द्यावी.