मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १८ लाख ९१ हजार क्विंटल साखर उत्पादन

छत्रपती संभाजी नगर : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी २६ लाख २३ हजार ८६० टन उसाचे गाळप केले आहे. १४ डिसेंबरअखेर या कारखान्यांनी १८ लाख ९१ हजार ४६९ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह खानदेशातील नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील कारखान्यांचा यात समावेश आहे. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.२१ टक्के राहिला.

विभागातील ऊस गळीत हंगामात १३ सहकारी तर ९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी साखर कारखान्यांची प्रतिदिन ऊस गाळपाची सरासरी क्षमता ४३,९०० टन असून, खासगी कारखान्यांची सरासरी गाळप क्षमता ४८,००० टन आहे. कारखान्यांनी १४ डिसेंबरला सरासरी ६८ हजार ३७० टन उसाचे गाळप केले. नंदुरबार जिल्ह्यातील २ कारखान्यांनी ८,८६० टन, जळगावमधील दोन कारखान्यांनी २,४५० टन, छत्रपती संभाजीनगरमधील सहा कारखान्यांनी १४,९५३ टन, जालन्यातील सहा कारखान्यांनी १४,६४५ टन, तर बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी २७,४६२ टन उसाचे गाळप केले. यातून ५८,५८२ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here