आजरा साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने 21 पैकी 19 जागांवर विजय मिळवला. विरोधी चराटी-शिंपी-रेडेकर गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

आजरा कारखाना निवडणुकीसाठी रविवारी (17 डिसेंबर) ६०.६८ टक्के मतदान झाले होते. कारखान्या्च्या एकूण ३२ हजार ७८४ सभासदांपैकी १९ हजार ८६६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. कारखान्याच्या या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे व ठाकरे गट यांची चाळोबादेव शेतकरी विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी मिळून केलेली रवळनाथ शेतकरी विकास आघाडी यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी मिळून स्थापन केलेल्या रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने बाजी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here