महाराष्ट्रातील ११ साखर कारखाने गाळप परवान्याच्या प्रतिक्षेत

पुणे : राज्यात यंदा १०२ खासगी व १०१ सहकारी साखर कारखान्यांना गाळपाचा परवाना मिळाला आहे. मात्र, ११ कारखान्यांनी शासकीय अटींची पूर्तता अद्यापही केलेली नाही. यापैकी काही कारखान्यांनी थकित एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे ऊस गळीत हंगाम निम्यावर आलेला असताना हे साखर कारखाने गाळप परवाना मिळवू शकलेले नाहीत. यात सात सहकारी व चार खासगी कारखान्यांचा समावेश आहे.

ॲगाळप परवाना मिळवू न शकलेल्या कारखान्यांमध्ये घृष्णेश्‍वर शुगर – अंबाजोगाई, अनुराज शुगर्स, घोडगंगा, राजगड, टोकाई, विठ्ठलसाई, तुळजाभवानी, अक्कलकोट, तासगाव, निफाड यांचा समावेश आहे. दरम्यान, परवाना घेतलेल्या २०३ कारखान्यांपैकी १९१ साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप सुरू केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.५४ टक्के मिळतो आहे.

कारखान्यांनी १८ डिसेंबरअखेर ३१६.४८ लाख टन ऊस खरेदी केला आहे. गाळपातून २७०.३४ लाख क्विंटल साखर तयार केलेली आहे. यातील काही कारखान्यांनी मुख्यमंत्री निधी, साखर संकुल निधी, ऊसतोड महामंडळाची वर्गणी दिलेली नाही. तर काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नाही. जयभवानी कारखान्याने उशिरा माहिती सादर केली असल्याने त्यांना परवाना देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here