सातारा : ऊस तोडणीसाठी परराज्यातून, जिल्ह्यातून येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या सुरक्षेसाठी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने रावबवलेले उपक्रम हिताचे असल्याचे प्रतिपादन ॲड. देवयानी कुलकर्णी यांनी केले. कुलकर्णी यांनी कारखान्याला भेट देवून हॉस्पिटल, पाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था शैक्षणिक सुविधा आदींबाबत पाहणी केली. ऊस तोडणी महिला मजुरांशी संवाद साधला.
यावेळी ॲड. रिशिका अग्रवाल, कारखान्याच्या व्हा. चेअरमन लक्ष्मीताई गायकवाड, संचालिका शारदा पाटील, यशवंतनरच्या सरपंच सुमय्या मोमीन, कराड जिल्हा न्यायालय अधीक्षक आर. डी. भोपते, विधी स्वयंसेवक के. व्ही. जाधव, पोलिस कॉन्स्टेबल विजया वाघमारे प्रमुख उपस्थित होते. कारखान्यचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसूती झालेल्या ऊस तोडणी महिलेच्या खोपीवर भेट देऊन आरोग्य विषयी सुविधांबाबत माहिती घेतली. त्या कुटुंबियांच्या आग्रहास्तव मुलाचे नामकरण त्यांनी केले.