जत तालुक्यात ऊस उत्पादनात निम्म्याने घट

सांगली : जत तालुक्यातील उमदी, उटगीसह पूर्व भागात मागील वर्षीच्या तुलनेत ऊसाचे उत्पादन निम्म्याने घटले आहे. पावसाने दडी मारल्याने उसाची वाढ खुंटली. पाण्याअभावी ऊस वाळत आहे. जत येथील दोन व तालुक्याच्या सीमेलगत लवंगी येथील भैरवनाथ शुगर व सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील अवताडे शुगर, कर्नाटक हद्दीतील दत्त इंडिया शुगर असे पाच कारखाने सुरू असले तरी तोडणी यंत्रणा विस्कळीत असल्याने ऊस गाळपासाठी वेळेवर जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

‘सकाळ’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्याने ऊसाची वाढ खुंटली आहे. वजन ४० टक्क्यांनी घटले आहे. उमदी, संख, भिवरगी, करजगी, सुसलाद, सोनलगी, मोरवगी, उटगी, अंकलगी, निगडी लमाणतांडा, मर्चंडीतांडा परिसरात सहा ते सात हजार हेक्टर ऊस आहे. जत येथील, राजारामबापू साखर कारखाना व डफळापूर येथील श्रीपतराव कदम कारखान्यासह पाच कारखाने ऊस तोडणी करीत आहेत. गेल्या महिन्यापासून ऊस तोडणी सुरू असली तरी गती संथ आहे. ऊसाची वाढ न होता वजन घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ऊस तोडणी टोळ्यांकडून, शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here