कोल्हापूर जिल्ह्यात ३९ लाख टन, तर सोलापूर जिल्ह्यात ६० लाख टन ऊस गाळप पूर्ण

कोल्हापूर : राज्यातील ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. अवघ्या महिनाभरात साखर कारखान्यांनी ३८ लाख ८१ हजार ५९ मे. टन ऊसाचे गाळप करुन ३८ लाख ३९ हजार १६० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.०४ आहे. तर सर्वाधिक गाळप करण्यात वारणानगरच्या तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. तर सोलापूर जिल्ह्यात यंदा ३४ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. गुरुवारपर्यंत ६० लाख ५१ हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गाळपामध्ये शाहू सहकारी साखर कारखाना आणि जवाहर सहकारी साखर कारखाना गाळपात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील २२ साखर कारखाने सुरू झाले असून त्यात १५ सहकारी व ७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी साखर कारखान्यांनी २७ लाख ७५ हजार ५४३ टन तर खासगी कारखान्यांनी ११ लाख ५ हजार ५१६ टनाचे गाळप केले आहे. कोल्हापूर विभागात ३७ साखर कारखान्यांनी ६८.१९ लाख टन उसाचे गाळप केले आहे तर ६६.७३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याची रिकव्हरी ९.७९ सरासरी उताऱ्यासह राज्यात आघाडीवर आहे. दरम्यान, सध्या पुणे विभाग आघाडीवर गाळप करत आहे. सोलापूर विभागाने दुसऱ्या स्थानावर आहे.

विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचे ६ लाख ५२ हजार मेट्रिक टन गाळप…

सोलापूर जिल्ह्यात यंदा ३४ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. गुरुवारपर्यंत ६० लाख ५१ हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांचे गाळप ६ लाख ५२ हजार मेट्रिक टन झाले आहे. जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब, पांडुरंग श्रीपूर, विठ्ठल पंढरपूर अशा काही मोजक्या कारखान्यांना ऊस तोडणी यंत्रणा पुरेशी असल्याने ऊस गाळप पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

जिल्ह्याचे ऊस गाळप राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. राज्यात पुणे जिल्ह्यातील बारामती ॲग्रोची गाळप क्षमता प्रती दिन १८ हजार तर माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांची गाळप क्षमता प्रती दिन ११ हजार मेट्रिक टन आहे. ७,४३,००० मेट्रिक टन गाळप करून बारामती ॲग्रो राज्यात पहिला आला आहे. तर ६,५२,००० मेट्रिक टन गाळप झालेला विठ्ठलराव शिंदे राज्यात दुसरा आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखाना ४,०५००० मेट्रिक टन गाळप करून जिल्ह्यात दुसरा आहे. विठ्ठल पंढरपूर हा ऊस गाळपात जिल्ह्यात तिसरा आहे. तर बीबीदारफळ येथील लोकमंगलचे गाळप अवघे ४१ हजार मेट्रिक टन झाले आहे. हे गाळप इतर कारखान्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here