गोकुळ शुगरचा २८०० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा : चेअरमन दत्ता शिंदे

सोलापूर : धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरने २१ ते ३० नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या उसाचे २८०० रुपये प्रमाणे पहिली उचल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली. दत्ता शिंदे म्हणाले, यंदाच्या ऊस गाळप हंगामात सध्या उस बिल वेळेत अदा करण्यात गोकुळ शुगरने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. शेतकऱ्यांनी आपले हित पाहून गोकुळ शुगरला परिपक्व ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन दत्ता शिंदे यांनी केले आहे. यावेळी व्हा. चेअरमन विशाल शिंदे, मॅनेजिंग डायरेक्ट कपिल शिंदे, कार्तिक पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here