अहमदनगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी महिला कामगारांसाठी आरोग्य समुपदेशन शिबीर पार पडले. अध्यक्षस्थानी संचालिका सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे होत्या. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी प्रास्तविक केले. ऊस हंगाम काळात स्थलांतर होते. यावेळी महिलांचे आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष होते, मात्र कोल्हे परिवाराचे सतत स्वतःच्या कुटूंबातील घटकाप्रमाणे श्रमीक वर्गाकडे लक्ष असते.
डॉ आसेफा पठाण म्हणाल्या, महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. सकस आहाराच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण असंतुलीत राहते. गरोदर महिलांनी नियमीत सकस आहार कसा घ्यावा, ठरावीक महिन्यातील लसीकरण काळजीपुर्वक घ्यावे, असे मार्गदर्शन केले. शासनामार्फत उसतोड कामगारांसाठी विविध योजनांविषयी ऊस व्यवस्थापक जी. बी. शिंदे यांनी माहिती दिली. यावेळी महिल्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.