सांगली : राजेवाडीच्या सद्गुरु श्री श्री कारखान्याच्या थकित बिलासंदर्भात आटपाडीचे तहसीलदार सीलदार सागर ढवळे यांनी उद्या (27 डिसेंबर) बळीराजा शेतकरी संघटनेबरोबर बैठक बोलावली आहे. कारखाना अद्याप शेतकऱ्यांचे १६ कोटी रुपये येणे बाकी आहे. बैठकीत निश्चित तोडगा न निघाल्यास दिघंची येथे शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा बलीराजा संघटनेने दिला होता.
बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उन्मेश देशमुख यांनी सांगितले की, थकीत ऊस बिलांबाबत १८ पर्यंत बिले न दिल्यास आंदोलनचा इशारा दिला होता. या थकीत बिलासंदर्भात तसेच ऊस दरासंदर्भात कारखान्याने २१/२२ वर्षीचा ऊस दर टनास २,४३७ रुपये ठेवला होता. आमच्या आंदोलनाने तो ६३ रुपयांनी वाढवून मिळाला. त्यावर्षी रिकव्हरी ११.८२ टक्के आणि गाळप ९ लाख १० हजार टन झाले होते. परंतु वाढीव रक्कम ५ कोटी ७३ लाख ३० हजार रुपये दिलेली नाही. ती मिळावी अशी मागणी आहे. ही बैठक २७ डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. जर कारखाना थकित रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असेल तर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन दिघंची येथे उपोषणास बसणार आहोत.