एफआरपी धोरण जाहीर : पुणे, नाशिक विभागात १०.२५ टक्क्याला ३,१५० रुपये दर

पुणे : राज्य सरकारने गाळप हंगाम २०२३ २४ साठी साखर कारखान्यांच्या एफआरपीप्रमाणे ऊस दर देण्याचे धोरण जाहीर केले आहे. हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत महसूल विभागनिहाय एफआरपी ऊस दर देण्यासाठी आधारभूत साखर उतारा निश्चित करण्यात आला आहे. नाशिक महसूल विभागाचा १०.२५ टक्के आणि छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर महसूल विभागाचा ९.५० टक्के उतारा निश्चित केला आहे.

‘पुढारी’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पुणे व नाशिक महसूल विभागाच्या उताऱ्यानुसार प्रती टन ३,१५० रुपये आणि इतर महसूल विभागास प्रती टन २,९२० रुपये एफआरपीचा दर राहील. ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणे अपेक्षित आहे. एफआरपीच्या धोरणाबाबत ६ जुलै २०२३ रोजी सरकारने अधिसूचना जारी केली. हंगाम २०२३-२४ करिता बेसिक १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रती क्विंटल ३१५ रुपये एफआरपी निश्चित आहे. साखर उतारा १०.२५ टक्क्यांवरील प्रत्येक ०.१ टक्का उतारा वाढीसाठी प्रिमियम दर ३.०७ प्रती क्विंटल आहे. साखर उतारा ९.५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर प्रत्येक ०.१ टक्केसाठी ३.०७ रुपये क्विंटल अशी आकारणी निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here