लातूर : नवीन तंत्रज्ञानाने मांजरा परिवार साखर उद्योगात भरारी घेईल, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी केले. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने खरेदी केलेल्या तीन ऊस तोडणी यंत्राचे पूजन शनिवारी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कारखान्याच्या सूत्रांनी सांगितले की, नव्या यंत्रसामग्रीमुळे ऊस तोडणीस गती येणार आहे. मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या गाळप हंगामात परिवारातील सर्व कारखाने योग्य रितीने सुरू आहेत. शेतकऱ्यांचा ऊस हार्वेस्टर द्वारे तोडण्यात येत आहे. चालू हंगामात गाळपास गती आल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले.
यंत्र पूजन प्रसंगी राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, ॲड. श्रीपतराव काकडे, रेणा कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, श्याम भोसले, सचिन पाटील, अनंत बारबोले, गुरूनाथ गवळी, सचिन दाताळ, संभाजी सूळ, श्रीकृष्ण काळे, विकास देशमुख तज्ज्ञ संचालक महेंद्रनाथ भादेकर, ज्ञानेश्वर भिसे, विशाल पाटील, कार्यकारी संचालक पंडित देसाई, श्रीनिवास देशमुख आदी उपस्थित होते.