सोनहिरा कारखान्याचा ३१७५ रुपये पहिला हप्ता वर्ग : चेअरमन मोहनराव कदम

सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ च्या गळीत हंगामात गळीतास आलेल्या उसास प्रति टन ३१७५ रुपयेप्रमाणे १ डिसेंबर २०२३ ते १५ डिसेंबर २०२३ अखेर १ लाख १६ हजार टन उसाचे ३६ कोटी ८३ लाख रुपये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. त्याचबरोबर १ नोव्हेंबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ अखेर कारखान्यास गाळपास आलेल्या १ लाख ७८ हजार मे. टन उसाचे प्र. मे. टन रुपये ३१०० प्रमाणे ५५ कोटी २१ लाख रुपये यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित ७५ रुपये लवकरच खात्यावर वर्ग करण्यात येतील, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार मोहनराव कदम यांनी दिली.

मोहनराव कदम म्हणाले की, कारखान्याने आजअखेर ४ लाख ५ हजार ९६० मे. टन ऊसाचे गाळप करून ३ लाख ५६ हजार १७० साखर पोत्यांचे उत्पन्न घेतले आहे. कारखान्याचे उपपदार्थ प्रकल्प को-जनरेशन व डिस्टीलरी पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कारखान्याने उत्तम प्रगती केली आहे. तरी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी कारखान्यास पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एफ. कदम आणि संचालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here