सांगली जिल्ह्यात क्षारपडमुक्त जमिनीसाठी ‘दत्त कारखाना’ पॅटर्न : चेअरमन गणपतराव पाटील

शिरोळ : येथील दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी कारखाना कार्यक्षेत्रात क्षारपडमुक्तीचा प्रकल्प राबवून आठ हजार एकर नापीक जमीन पिकाखाली आणली आहे. आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चेअरमन पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन स्वतःची नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी कृतीशील पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील कवठेएकंद, भिलवडी व वाळवा येथे जमीन सुधारणेचे काम सुरू झाले आहे. गणपतराव पाटील हे शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना नापीक जमीन सुधारणा विषयी तंत्रज्ञान समजून सांगत आहेत.

कारखान्याच्या क्षारपडमुक्त जमिनीचा पॅटर्न देश पातळीवर पोहोचला आहे. शिरोळ तालुक्यात क्षारपड बनलेल्या २५ हजार एकर जमिनीपैकी आठ हजार एकर नापीक जमीन पिकाखाली येत आहे. गणपतराव पाटील यांच्या पुढाकारातून यापैकी ३,५०० एकर जमिनीवर प्रत्यक्ष पिके जोमाने डोलू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबता येत आहे.

 

क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पांतर्गत पाटील यांनी त्यांनी डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर- उदगाव बँकेतून शेतकऱ्यांना ५० कोटींची कर्जेही उपलब्ध करून दिले आहेत. क्षारपडमुक्त जमिनीत ऊस, सोयाबीन, हरभरा, शाळू, भुईमूग आदी पिके घेतली जात आहेत. या शेतांत एकरी ९० टन ऊस उत्पादन तर काहींनी भरघोस भाजीपाला उत्पादनही घेतले आहे. ही मोहीम आता सांगली जिल्ह्यातील कवठेएकंद, भिलवडी व वाळवा या गावात राबविली जात असल्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here