आयुक्तालयाने मागवली साखर कारखान्यांच्या ‘एमडीं’च्या वयाची माहिती

पुणे : राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्या (एमडी) वयाचा तपशील सादर करावा असे आदेश साखर आयुक्तालयाने दिले आहेत. मध्यंतरी अहमदनगर जिल्ह्यातील एका सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या एमडीला थेट वयाच्या ६३ व्या वर्षीदेखील एमडी करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला. या निर्णयाला एका शेतकऱ्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले.

न्यायालयाने या प्रकरणात सहकार विभागाचा आदेश रद्द करत बेकायदेशीरपणे मुदतवाढ देणाऱ्या यंत्रणेवर कडक ताशेरे ओढले. ही चूक इतरत्र होऊ नये म्हणून आता साखर आयुक्तालयाने सर्व एमडींच्या वयाचा तपशील मागवला आहे. ‘एमडी’ने वयाची ६० वर्षे पूर्ण होताच निवृत्त करावे, अशी अपेक्षा या पदासाठी पात्रताधारक इतर उमेदवारांची आहे. परंतु २०१५ मध्ये राज्य शासनाने निवृत्त होणाऱ्या ‘एमडी’ला साखर आयुक्तांनी ठरविल्यास अजून एक वर्षांची मुदतवाढ देता येईल, असा निर्णय घेतला होता. अशा एमडीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ हवी असल्यास सहकार मंत्रालय मान्यता देऊ शकते, अशीही मुभा दिली गेली. त्यामुळे आता साखर आयुक्तालय सद्यस्थितीची माहिती गोळा करीत आहे. याशिवाय, प्रभारी ‘एमडी’ ची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here