संजीवनी कारखान्याच्या शेतकरी सोमवारी पणजीत करणार आंदोलन

पणजी : बंद पडलेला संजीवनी साखर कारखाना सुरू करून इथेनॉल युनिट सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू ठेवलेल्या शेतकऱ्यांनी आता पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. साखर कारखान्यासाठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी इनेथॉल प्लांटची मागणी केली होती. मात्र सरकार यावर गंभीरपणे विचार करत नाही, असा आरोप त्यांचा आहे. गोमंतक ऊस उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी २ जानेवारीपासून आंदोलनाला सुरू ठेवले आहे.

शेतकऱ्यांनी ८ जानेवारीपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा नि्णय घेतला आहे. राजधानी पणजीत आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनात २५० ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री आमची दाखल घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असे शेतकऱ्यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here