संत गोपाळबुवा साखर कारखाना निश्चितपणे प्रगती करेल : परमपूज्य श्री विद्यानंद बाबा महाराज गातेगावकर

लातूर : जन्मोजन्मीची पुण्याई, सर्वांचा स्नेह आणि साधुसंताप्रती समर्पणाचा भाव असा त्रिवेणी संगम कराड परिवाराच्या मागे असल्याने रामेश्वरच्या पवित्र भूमीत उभारण्यात येत असलेला संत श्री गोपाळ बुवा महाराज साखर कारखाना यशस्वी होऊन भविष्यात निश्चितपणे प्रगती करेल, असा विश्वास परमपूज्य श्री विद्यानंद बावा महाराज गातेगावकर यांनी व्यक्त केला.

रामेश्वर परिसरात उभारण्यात येत असलेल्या संत श्री गोपाळबुवा महाराज शुगर अँड अँग्रो फूड इंडस्ट्रीज या साखर कारखान्याच्या मशनरी उभारणीचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ५) परमपूज्य श्री विद्यानंद बाबा महाराज गातेगावकर यांच्या हस्ते विधिवत पूजनाने करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याच्या शेअर्सची रक्कम २५ हजार रुपये असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात १० हजार रुपये जमा करावेत, उर्वरित १५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात केली जाईल. १५ हजार रुपये इतर कारखान्याप्रमाणे कर्ज असणार नाही अथवा त्यावर कुठलीही व्याजाची आकारणी केली जाणार नाही. तेव्हा ऊस उत्पादक गरजवंत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेअर्स नोंदणी करावी, असे आवाहन व्हाईस चेअरमन राजेश कराड यांनी केले.

यावेळी परमपूज्य बालकानंद स्वामी महा राज, हभप लालासाहेब नाना महाराज, कारखान्याचे चेअरमन तुळशीराम अण्णा कराड, व्हाईस चेअरमन राजेश कराड यांच्यासह काशीराम नाना कराड, बाळू तात्या कराड, रणवीर कराड, राजवीर कराड, भाजपाचे महेंद्र गोडभरले, अनिल भिसे, ॲड. दशरथ सरवदे, बन्सी भिसे, सतीश आंबेकर, नवनाथ भोसले, सुरज शिंदे, गोविंद नरहरे, गोपाळ पाटील, भैरवनाथ पिसाळ, सुधाकर कराड, विनायक मगर, शंकर चव्हाण, बाबा भिसे आदीसह परिसरातील ऊस उत्पादकासह शेतकरी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here