राजाराम साखर कारखान्याची सुनावणी पूर्ण : लवकरच लागणार निकाल

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या कार्यक्षेत्र वाढ पोटनियम दुरुस्तीवरील सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली. पोटनियम दुरुस्तीवर ‘राजारामबापू’, ‘वारणा’, ‘बिद्री’, ‘भोगावती’ या कारखान्यांनीही हरकत घेतली होती. लवकरच याबाबतचा निकाल अपेक्षित आहे.

‘राजाराम’ कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत वाळवा तालुक्यातील तेरा गावांसह करवीर, हातकणंगले तालुक्यातील गावांचा कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा ठराव केला होता. याला विरोधी आमदार सतेज पाटील यांच्या गटाने विरोध दर्शवला होता. पण, सभेत हा ठराव मंजूर केला. याविरोधात आमदार पाटील यांनी वाळवा तालुक्यातील तेरा गावांवर व तीन वर्षे ऊस पुरवठा न करणाऱ्या, सभेला उपस्थित न राहणाऱ्यांचे सभासदत्व रद्द करण्याच्या ठरावाला प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे हरकत घेतली होती. त्याचबरोबर राजारामबापू कारखान्याने वाळवा तालुक्यातील, ‘वारणा’ने हातकणंगले तर ‘बिद्री’ व ‘भोगावती’ने करवीर तालुक्यातील गावांवर हरकत घेतली होती. त्याची एकत्रित सुनावणी प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक जी. जी. मावळे यांच्या समोर मंगळवारी पूर्ण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here