ऊस लागवड वाढविण्यासाठी ट्वेन्टीवन शुगर्सची नवी योजना

लातूर : कार्यक्षेत्रातील सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ट्वेन्टीवन शुगर्स साखर कारखान्यान २०२४-२५ या हंगामाकरिता नवी ऊस लागवड योजना जाहीर केली आहे. आमदार अमित देशमुख यांनी जाहीर केलेल्या या योदनेनुसार, शेतकऱ्यांनी को. ८६०३२, एम.एस. १०००१, कोसी. ६७१, कोव्हीएसआय ०८००५, कोव्हीए सआय १८१२१ या सुधारित जादा साखर उतारा देणाऱ्या जातींच्या उसाची लागवड करावयाची आहे. या उसाचे १२ महिन्यांत गाळप करून उसाला प्रती टन १०० रुपये एफआरपीपेक्षा अधिक दर देण्यात येणार आहे.

पुढील गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवड होऊन गाळपक्षमते इतका ऊस निर्माण होण्यासाठी हे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना किमान ०.४० आर क्षेत्रावर ऊस लागवड करावी लागेल. योजनेत लागवड केलेला ऊस पुढील हंगामात गाळपास घेण्याची हमी कारखान्याने घेतली आहे. सभासदांनी योजनेत सहभागासाठी गट कार्यालयात नावनोंदणी करावी, असे आवाहन कारखान्याने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here