कृष्णा कारखाना, जयवंत शुगर्सला ‘व्हीएसआय’तर्फे पुरस्कार प्रदान

सातारा : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने २०२२-२३ या गळीत हंगामातील कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार तर, धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) मांजरी-पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप व ‘जयवंत शुगर्स’चे विनायक भोसले यांच्यासह दोन्ही कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. याप्रसंगी ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष तथा सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आ. जयंत पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून विविध ऊसविकास संवर्धन योजना व उपक्रम राबविले जातात. जयवंत शुगर्समध्ये उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठी १०० टक्क्यांहून अधिक गाळप क्षमतेचा वापर म्हणजे १४७. ७४ टक्के गाळप क्षमतेचा वापर केला गेला आहे. कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्सच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ‘व्हीएसआय’ने हे पुरस्कार प्रदान केले आहेत.

याप्रसंगी कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, अविनाश खरात, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक राम पाटील, वैभव जाखले यांच्यासह मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, ‘जयवंत शुगर्स’चे जनरल मॅनेजर एन. एम. बंडगर, डेप्युटी जनरल मॅनेजर (टेक्निकल) आर. आर. इजाते, चिफ इंजिनिअर एच. एम. नदाफ, चीफ केमिस्ट बी. जी. चव्हाण, ए. बी. खटके, प्रशासकीय अधिकारी आर. टी. शिरसाट आदींची उपस्थिती होती.

जयवंत शुगर्सचे सुर्ली (ता. कोरेगाव) ) येथील ऊस उत्पादक शेतकरी सुहास मधुकांत पाटील यांनी प्रति हेक्टरी २९९. ९.२४ मेट्रिक टन ऊस उत्पादन पूर्व हंगामात घेतले आहे. त्यांना दक्षिण विभागातील ऊसभूषण पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here