वाळवा तालुक्यात आतापर्यंत २८ लाख टन ऊस गाळप

सांगली : गेल्या दोन महिन्यात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका कार्यक्षेत्र असलेल्या ८ साखर कारखान्यांनी २८ लाख ४६ हजार ५५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. तर २९ लाख ५९ हजार ७३० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. हंगामात गाळपात कृष्णा कारखाना तर साखर उताऱ्यात राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटने आघाडी घेतली आहे. यावर्षी कार्यक्षेत्रात मशिनची संख्या जास्त असल्याने उसाचे क्षेत्र झपाट्याने कमी होऊ लागले आहे. तोडणी मजुरांच्या टोळ्या कमी आल्याने अनेक भागात हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस तोडणी सुरू आहे.

यंदा नोव्हेंबर महिन्यात बहुतांश कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले. मात्र, ऊस दरावर तोडगा निघत नव्हता. त्यामुळे सुरुवातीला ऊस तोडणी संथगतीने सुरू होती. गेल्या ६०-६५ दिवसांत राजारामबापू, हुतात्मा, कृष्णा, विश्वास, वारणा या साखर कारखान्यांनी २८ लाख ४६ हजार, ५५ मे. टनाचे गाळप केले आहे. यामध्ये सर्वात जास्त गाळप कृष्णा साखर कारखान्याने ७ लाख १० हजार ७६० टनाचे गाळप केले आहे. साखर उताऱ्यामध्ये राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटने आघाडी घेतली आहे. या कारखान्याचा सर्वात जास्त ११. ८४ साखर उतारा आहे. राजारामबापूच्या चार युनिटचे मिळून १० लाख ४ हजार ४२५ टनाचे गाळप झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here