ऊसतोड मजूर पुरवण्याच्या आमिषाने ८ लाखांची फसवणूक

सांगली : ऊसतोड मजूर पुरवठा करतो, असे सांगून दोघांची आठ लाखांची फसवूणक केल्याप्रकणी मुकादम धुळाप्पा बाळू मासाळ (रा. आरकेरी, जि. विजापूर) याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भानुदास हणमंत खरात (रा. खरातवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही फसवणूक दि. २४ ऑगस्ट २०२३ पासून ते दि. ११ जानेवारी २०२४ च्या दरम्यान घडली आहे. खरातवाडी येथील

शेतकरी भानुदास खरात व त्यांचे पाहुणे राजाराम गावडे यांना ऊसतोड मजुरांचा पुरवठा करतो, असे मुकादम धुळाप्पा मासाळ याने सांगितले. त्याने या कामी खरात यांच्याकडून ४ लाख व गावडे यांच्याकडून ४ लाख रूपये ऑगस्ट २०२३ मध्ये घेतले होते मात्र जानेवारी २०२४ पर्यंत त्याने ऊसतोड मजूर न पुरवता त्यांची ८ लाख रूपयांची फसवणूक केली. याबाबत खरात यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here