नवी दिल्ली : देशाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारे आणि उद्योग प्रतिनिधींची १६ जानेवारी २०२४ ला बैठक होणार आहे. या बैठकीत रुपयातील पेमेंटची आव्हाने, जागतिक शिपिंगची गरज आणि लाल समुद्रातील संकटामुळे व्यापाऱ्यांना भेडसावणारी आव्हाने आणि रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल -हमास संघर्ष, जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार या बैठकीचे अध्यक्षस्थान वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल भूषविणार आहेत. या बैठकीला विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.