अहमदनगर : ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील अनेक घटकांना रोजगार मिळाला आहे. अनेक कुटुंबांना मोलाचा आधार कारखान्याने दिला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र घुले यांनी केले. कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळातर्फे मकर संक्रांतीनिमित्त सामूहिक तिळगूळ वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात घुले, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक ॲड. देसाई देशमुख, यांच्या हस्ते तिळगू- ळवाटप करण्यात आले. सांस्कृतिक मंडळाचे सचिव दीपक नवले, खजिनदार विष्णूपंत वाबळे, रमेश मते, सुरेश आरगडे, कारभारी गायके, राहुल पाटील, सुरेश आहेर, काशीनाथ नवले, काकासाहेब शिंदे, डॉ. नारायण म्हस्के, शिवाजी कोलते, भाऊसाहेब कांगुणे, मच्छिंद्र म्हस्के, अशोक मिसाळ, दादासाहेब गंडाळ, विष्णूपंत जगदाळे आदी उपस्थित होते.