सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्यावर तब्बल २३० कोटी रुपयांचे कर्ज आहे. जर कारखाना वाचविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही, तर कारखाना मार्चनंतर अवसायनात निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. शिवरत्न बंगल्यावर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आदिनाथ कारखाना पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यााठी निःस्वार्थपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला धैर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार नारायण पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, कन्हैयालाल देवी, धनंजय डोंगरे, डॉ. वसंत पुंडे, धुळाभाऊ कोकरे, रंगनाथ शिंदे, सरपंच मौला मुलाणी, हरिभाऊ मंगवडे, नवनाथ देशमुख आदींसह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सभासद, शेतकरी उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन आदिनाथ कारखान्याबाबत निर्णय घ्यावा. मार्ग काढावा अशी मागणी केली. विलासराव घुमरे, संचालक हरिदास डांगे, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आ. नारायण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ज्ञानेश्वर पवार यांनी स्वागत केले. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आभार मानले.