सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याकडून हेल्पलाईन : अध्यक्ष विवेक कोल्हे

अहमदनगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांसाठी कारखान्याने ९३७१७१२६२२ हा हेल्पलाइन नंबर तयार केला आहे. सभासद शेतकरी बांधवांनी नंबरचा वापर करावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे. कोल्हे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया ऑनलाईन कामकाज संकल्पनेला मोठे प्राधान्य दिले आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनराव कोल्हे यांनी हायटेक डिजिटल संकल्पनेचा अवलंब कोल्हे कारखान्यात केला आहे.

दैनंदिन प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणून, त्याचा थेट सभासद शेतकऱ्यांना लाभ व्हावा, हा यामागचा उद्देश असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. कारखान्याच्या कामकाजासंदर्भात हेल्प लाईंवर संपर्क साधावा, असे आवाहन उपाध्यक्ष मनेश गाडे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here