SEIC 2024 : सर्वात मोठ्या साखर आणि इथेनॉल परिषदेची जय्यत तयारी

नवी दिल्ली : अवघ्या ५ दिवसांनी देशातील साखर आणि इथेनॉलची सर्वात मोठी SEIC 2024 परिषद होणार आहे. साखर, इथेनॉल आणि संबंधित उद्योगांना सेवा देणारे देशातील सर्वात मोठे न्यूज आणि नेटवर्किंग पोर्टल ‘चीनीमंडी’ द्वारे साखर आणि इथेनॉल इंडिया परिषदेची (SEIC 2024) तिसरी आवृत्ती (३rd edition of the Sugar and Ethanol India Conference) आयोजित केली जात आहे. १ आणि २ फेब्रुवारी २०२४ रोजी एरोसिटी, नवी दिल्ली येथील हॉटेल अंदाज बाय हयात येथे ही परिषद होणार आहे. २०२३ मधील परिषदेत तब्बल ६५० पेक्षा जास्त वक्ते आणि तज्ज्ञांच्या सहभागाने परिषद प्रचंड यशस्वी ठरली होती. यंदाची SEIC 2024 परिषद मागील सर्व विक्रम मोडेल, अशी अपेक्षा आहे.

मोठमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील साखर आणि व्यापार तज्ज्ञ, देशांतर्गत अभ्यासक, कृषी तज्ज्ञ असे प्रत्येकजण या दोन दिवसांत साखर, इथेनॉल आणि त्याच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी एकत्र येत आहे. १ फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही परिषद २ दिवस चालणार आहे. या परिषदेत एकूण सात पॅनल चर्चा आहेत.

पॅनल चर्चेचे विषय पुढीलप्रमाणे…

१. गोड दृष्टिकोन : जागतिक साखर बाजारातील गतिशीलता नेव्हिगेट करणे

२. इथेनॉल आणि साखरेच्या भविष्यात गुंतवणूक

३. शाश्वत सिनर्जी : साखर आणि इथेनॉल उद्योगात मूल्य वाढवणे

४. भारतीय ऊस पिकावरील दृष्टिकोन : २०२४ आणि त्यापुढील

५. २०२५ पर्यंत निर्यात किंवा आयातीचा अंदाज : देशांतर्गत स्टॉक परिस्थिती

(भारताने चक्र मोडले आहे का?)

६. साखर : तेजी…की मंदी..? (देशांतर्गत साखर व्यापारातील गतिशीलता आणि ट्रेंड एक्सप्लोर करणे)

७. भारत २०२५ पर्यंत २०% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठू शकेल का ?

आव्हाने आणि संधी :

SEIC 2024 साठी, प्रस्तुत प्रायोजक प्रतिष्ठित एमआरएन (निरानी) समूह आहे आणि शीर्षक प्रायोजक केबीके समूह (रेणुका शुगर ग्रुप कंपनी) आहे. एकूण ५० कंपन्या प्रायोजकत्वासाठी एकत्र आल्या आहेत. प्रायोजकांसोबतच ‘चीनीमंडी’ काही आघाडीच्या आणि सर्वोच्च संस्था आणि संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे, जे या परिषदेचे सहयोगी भागीदार आहेत. अशाप्रकारे देशातील सर्वात मोठी परिषद आयोजित करणे खरोखरच अविश्वसनीय आहे.

‘चीनीमंडी’तर्फे आयोजित परिषद त्यांच्या अद्वितीय नेटवर्किंग संधींसाठी ओळखल्या जातात आणि SEIC २०२४ ही आतापर्यंतची सर्वात मोठी नेटवर्किंग संधी असण्याची अपेक्षा आहे. परिषदेतील वक्ते रॉबिन शॉ (साखर विश्लेषण प्रमुख), मारेक्स स्पेक्ट्रॉन, ज्युलियन प्राइस (कार्यकारी संचालक, एसीपी/एलडीसी शुगर इंडस्ट्रीज ग्रुप), अतुल चतुर्वेदी (कार्यकारी अध्यक्ष, श्री रेणुका शुगर्स लिमिटेड), डॉ. क्लॉडिओ कोव्ह्रिग (संस्थापक आणि) या परिषदेतील वक्ते वरिष्ठ विश्लेषक, कोवरिगएनालिटिक्स, स्वित्झर्लंड), श्री. प्रभाकर राव (अध्यक्ष, ISMA), रोशन लाल तमक (सीईओ, डीसीएम श्रीराम), नरेंद्र मोहन (संचालक, राष्ट्रीय साखर संस्था, कानपूर), संदीप कदम (एमडी, ईडीएफ मॅन इंडिया), मनीषा गुप्ता (ग्रुप कमोडिटी एडिटर, सीएनबीसी-टीवी १८) इत्यादी मोठ्या लोकांचा समावेश आहे.

शुगर आणि इथेनॉल इंडिया कॉन्फरन्सचे सर्वात मोठे आकर्षण १ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री उलगडेल. साखर आणि इथेनॉलसाठी ऑस्कर पुरस्कार प्रथमच प्रदान केले जाणार आहेत. उद्योगाला नवीन उंचीवर नेण्यासाठी व्यक्ती आणि कंपन्यांचे कठोर परिश्रम, योगदान आणि अद्वितीय नवकल्पना ओळखण्यासाठी आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी, ‘चीनीमंडी’ रात्री ग्लॅमर, मनोरंजनाचा कार्निव्हल आयोजित करत आहे.

साखर आणि इथेनॉल आंतरराष्ट्रीय पुरस्कार (SEIA-२०२४)…

SEIA २०२४चे उद्दिष्ट साखर, इथेनॉल आणि संबंधित उद्योगांमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेणे आणि त्यांचे कौतुक करणे आहे. संस्था आणि व्यक्तींनी साखर आणि इथेनॉल उद्योगांवर त्यांच्या मेहनतीची, योगदानाची आणि त्यांनी सोडलेली चिरस्थायी छाप यांची ओळख आणि मान्यता म्हणून साजरा केला जाईल.

एकूण २८ श्रेणींमध्ये पुरस्कार वितरण…

श्रेणी अशा… ऊस उत्पादक (शेतकरी), खाजगी कारखाने, सहकारी कारखाने, इथेनॉल उत्पादक, स्टँडअलोन डिस्टिलरीज, खांडसरी कारखाने, देशांतर्गत व्यापारी, आंतरराष्ट्रीय व्यापार घराणे, साखर किरकोळ विक्री श्रृंखला, लॉजिस्टिक कंपन्या, रेक ट्रान्सपोर्ट, सी&एफ एजंट, बँका, एनबीएफसी, ब्रँडेड साखर, घाऊक ग्राहक, बंदरे, साखर कारखाने पुरवठादार, अभियांत्रिकी कंपन्या, आंतरराष्ट्रीय व्यापारी (व्यक्ती), सामाजिक कार्यकर्ते, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती, संपार्श्विक व्यवस्थापन, विमा कंपन्या, लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड, संशोधन गृहे आणि संस्था यांचा समावेश आहे.

अवॉर्ड नाईटमध्ये भरपूर मनोरंजन…

अवॉर्ड नाईटमध्ये भरपूर मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. १९९० च्या दशकात ‘मैने प्यार किया’ या तीन शब्दांनी प्रत्येक माणसाला प्रेमात पाडणारी बॉलीवूड क्वीन भाग्यश्री स्टेजवर अवतरेल आणि विजेत्यांना पुरस्कार प्रदान करेल. दिल्लीच्या डान्स ग्रुप आणि मेंटालिस्ट – जिगरच्या मानसिक ताकदीची चाचणी घेणारा कार्यक्रम सादर करतील. त्यांच्यासोबत पुरस्काराची रात्र आणखी रोमांचक होईल. बॉलीवूडचा दमदार अभिनेता जिमी शेरगिल संमेलनाच्या प्रायोजकांचा गौरव करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here