छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या शेतकरी विकास पॅनलच्या प्रचार नारळ सी. ए. सचिन घायाळ यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला. यावेळी विरोधकांवर टीका करताना घायाळ म्हणाले की, काहींनी प्रशासक नेमणूक करण्याची मागणी केली. मात्र, त्यांना कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल तयार करता आले नाही. विरोधकांनी ऊस सभासद उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, असेही घायाळ यांनी म्हटले.
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालक पदांसाठी ११ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी कारखाना चालविणारे सी.ए. सचिन घायाळ व चेअरमन तुषार सिसोदे यांनी सहा संचालक बिनविरोध निवडून आणले. आता उर्वरीत १५ उमेदवारांसाठी संत एकनाथ शेतकरी विकास पॅनल रिंगणात आहे. या पॅनलचा प्रचार शुभारंभ संत एकनाथ महाराज मंदिरात श्रीफळ फोडून करण्यात आले. माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, रेखाताई कुलकर्णी, महेश जोशी, डॉ भारत झारगड, ज्येष्ठ संचालक विक्रम घायाळ, अक्षय सिसोदे, प्रल्हाद औटे, दत्तात्रय आम्ले आदी उपस्थित होते.