पुणे : राज्यात गळीत हंगाम सध्या मध्यावर आला आहे. जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात जोमाने ऊस गाळप सुरू आहे. यंदा खासगी १०४ तर सहकारातील १०३ साखर कारखान्यांकडून गाळप केले जात आहे. सहकारी कारखान्यांनी पावणेचार कोटी तर खासगी कारखान्यांनी साडेतीन कोटी टन उसाचे गाळप केले आहे. सहकारी कारखान्यांनी ३ कोटी ७७ लाख ४८ हजार ९४४ क्विंटल तर खासगी कारखान्यांनी ३ कोटी १५ लाख ११ हजार १४० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. यंदा सहकारी साखर कारखान्यांनी गाळप व उत्पादनात आणि उताऱ्यातही बाजी मारली आहे.
सहकारी कारखाने प्रती दिन ४ लाख ९० हजार तर खासगी कारखाने ४ लाख ५६ हजार ६०० टन उसाचे गाळप करतात. ५ फेब्रुवारीअखेर सहकारी कारखान्यांनी ३ कोटी ७२ लाख ६४ हजार ९२० टन उसाचे गाळप करून ३ कोटी ७७ लाख ४८ हजार ९४२ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. दुसरीकडे खासगी कारखान्यांनी ३ कोटी ४३ लाख ४९ हजार ८१३ टन उसाचे गाळप करून ३ कोटी १५ लाख ११ हजार १४० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सहकारी साखर कारखान्यांच उतारा हा १०.१३ तर खासगी कारखान्यांचा सरासरी उतारा हा ९.१७ टक्के आहे.