विलास कारखान्यावर होणार लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण

लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण आणि कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा (विलासभवन) शिलान्यास निवळी येथील विलास सहकारी कारखाना साखर परिसरात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम काँग्रेसचे महासचिव, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.१० वाजता होणार आहे.

कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख या कार्यक्रमाच्या निमंत्रक असून अध्यक्षस्थानी सहकार महर्षी, माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दिलीपराव देशमुख असतील. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंतराव पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख उपस्थित राहतील. शिवाय अभिनेते रितेश देशमुख, ‘लातूर ग्रामीण’चे आमदार धीरज देशमुख, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले आदी उपस्थित राहतील.
या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here