सातारा : प्रतापगड सहकारी साखर कारखान्याने १६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे १३ कोटी ५२ लाख ४ हजार रुपये बिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग केले आहे. अजिंक्यतारा- प्रतापगड उद्योग समूहाचे मार्गदर्शक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही माहिती दिली.
आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, प्रतापगड साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरू आहे. कारखान्याने १६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ४५०६८.१३३ मे. टन उसाचे गाळप केले आहे. या गाळप केलेल्या उसाला प्रती टन ३,००० रुपये दर देण्यात आला आहे. त्यानुसार १३ कोटी ५२ लाख ४ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ६ फेब्रुवारी २०२४ रोजी वर्ग करण्यात आले आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेत जाऊन त्याची खात्री करावी, असे त्यांनी सांगितले.