सोलापूर : विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट १ पिंपळनेर येथील वजन काट्याची वजन काटे तपासणी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली. यावेळी वजनकाटे अचूक वजन दर्शवित असल्याचे आढळले. उसाच्या वजनात तफावत आढळून आली नाही. वैधमापन विभागाने सर्व ऊस वजन काटे योग्य असल्याचा निर्वाळा दिला.
पुण्यनगरीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी ११ वाजता वैधमापनशास्त्र विभागाच्या भरारी पथकाने सर्वांसमोर पंचनामा केला. यावेळी ऊस वजन काट्यामध्ये तफावत आढळून आली नाही. वजनकाटे चोख व अचूक वजन दर्शवित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आहे. वैध मापन शास्र विभागाचे उपनियंत्रक अ. ध. गेटमे व निरीक्षक बी. एम. नांदे यांच्या पथकाने ही तपासणी केली. कारखान्याचे वर्क्स मॅनेजर ए. डी. ढेकणे, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर ए. पी. माने, ऊस पुरवठा अधिकारी एन. एन. गायकवाड, ऊस उत्पादक शेतकरी व वाहनमालक उपस्थित होते.