महाराष्ट्रात मागील हंगामाप्रमाणेच साखरेची रिकवरी; आतापर्यंत ७६८.५ लाख क्विंटल उत्पादन

पुणे : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन घटले असले तरी साखरेची रिकवरी जवळपास गेल्या हंगामासारखीच आहे.साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार 2023-24 च्या हंगामात 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत राज्यातील साखरेची रिकवरी 9.81 टक्के होती, तर गेल्या हंगामात यावेळेपर्यंत साखरेची रिकवरी 9.82 टक्के होती.

राज्यात काही साखर कारखान्यांनी उसाच्या कमतरतेमुळे गाळप बंद करण्यास सुरुवात केली आहे. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 च्या हंगामात महाराष्ट्रात 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत 4 साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे तर गेल्या हंगामात याचवेळी 13 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते.गाळप हंगाम बंद केलेल्या कारखान्यांमध्ये सोलापूर विभागातील एक साखर, छत्रपती संभाजी नगर विभागातील दोन आणि नांदेड विभागातील एका साखर कारखान्याचा आहे.

यंदाच्या हंगामात एकूण 207 साखर कारखानदारांनी गळीत हंगामात सहभाग घेतला. यामध्ये 103 सहकारी आणि 104 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश असून आतापर्यंत 783.37 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ७६८.५ लाख क्विंटल (७६.८५ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात याचवेळी 210 साखर कारखाने कार्यरत होते आणि त्यांनी 858.59 लाख टन उसाचे गाळप करून 843.31 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here