सांगली : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला ज्येष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी त्यांचे स्वागत केले. तुमच्या चळवळीला कोणतीही मदत लागो, आम्हाला कधीही हाक मारा. या चळवळीत आम्ही नक्की सहभागी होऊ, असा शब्द शरद लाड यांनी डॉ. विश्वंभर चौधरी यांना दिला.
यावेळी डॉ. विश्वंभर चौधरी यांनी निर्भय बनो अभियानाची माहिती दिली. ते म्हणाले की, आपल्या कार्यकत्यांत पुरोगामी विचार रुजवण्यासाठी कारखान्याने तीन महिन्यांतून एखादे शिबिर घ्यावे. यातून राज्यघटनेपासूनचे ज्ञान आजच्या युवकांना दिले तर पुरोगामी कार्यकर्ते घडतील आणि यासाठी आम्ही ‘निर्भय बनो’ हे अभियान राबवत आहोत. सध्याचे देशाचे राजकीय वातावरण पाहता तिसऱ्या आघाडीची डाळ निवडणुकीत शिजेल, असे वाटत नाही. दरम्यान, यावेळी अध्यक्ष लाड यांनी तुमच्या चळवळीला कोणतीही मदत लागो, या चळवळीत आम्ही नक्की सहभागी होऊ असे सांगितले.